Samir Soni On Karan Johar And Farah Khan| अभिनेता समीर सोनीला हिंदी सिनेसृष्टीत फारसे यश मिळू शकले नाही. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच समीरने 2023 पासून चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने निर्मात्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र कलाकार त्यांची फी वाढवत आहेत. अनेक चित्रपट निर्मात्यांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली होती. यावर भाष्य करत समीर सोनीने करण जोहर आणि फराह खान यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर सोनी म्हणाला, “मला करण जोहर आणि फराह खानला हे सांगायचं आहे की जर सिनेमा बनवण्याचा तुमचा खर्च वाढत चालला असेल तर याला तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुम्हीच स्टार कलाकाराला 100 कोटी देता आणि नंतर स्वत:च म्हणता की कलाकार खूप मानधन घेतात. तुमचीही यात चूक आहे. नाहीतर अनेक कलाकार एक कोटी किंवा 50 लाख घेऊनही काम करतात. कलाकारांना डोक्यावर चढवून ठेवणारे हेच दोघं आहेत.” दरम्यान, काही दिवसांपूर्वी करण जोहरने एका मुलाखतीत अभिनेत्यांच्या वाढत्या फीबद्दल बोलले होते. समीर सोनी नुकताच ‘मेड इन हेवन’ वेबसीरिजमध्ये दिसला होता. याशिवाय त्याने ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘बागबान’ या सिनेमांमध्येही काम केले आहे. हेही वाचा: जस्मिन भसीन डोळ्याच्या दुखापतीतून झाली ‘बरी’