भुजबळांच्या पुतण्याला दादांचे राजीनाम्याचे फर्मान? युतीधर्म की पवारांची खेळी…

Sameer Bhujbal Resignation – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात रोज महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अशातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली आहे.
एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भुजबळ यांच्याकडून मुंबई अध्यक्षपद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मागण्यात आला आहे. समीर भुजबळ यांच्या शरद पवार गटात प्रवेशाच्या चर्चांना यामुळे आणखी बळ मिळाले आहे.
…तर नाशिक जिल्ह्यात काका विरुद्ध पुतण्या
समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. जर समीर भुजबळ शरद पवार गटात गेले आणि नांदगावमधून निवडणूक लढवली, तर नाशिक जिल्ह्यात काका-पुतण्या यांच्यात थेट राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी | Sameer Bhujbal Resignation
समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. काही दिवसांपासून त्यांनी नांदगावमध्ये आपली सक्रियता वाढवली असून, तेथील स्थानिक पातळीवर प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी, मंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर सूचक वक्तव्य करत, “तुम्ही आता मोठे झालात, तुमचे निर्णय स्वत: घ्या,” असा सल्ला दिला होता.
या वक्तव्यामुळेच समीर भुजबळ शरद पवार गटात जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यांच्या या हालचालींमुळे नांदगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.
नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित | Sameer Bhujbal Resignation
नांदगाव विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला जातो. विद्यमान आमदार सुहास कांदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या तिकिटावर समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे समीर भुजबळ यांनी शरद पवार गटात प्रवेश करून तिथून उमेदवारी मिळवण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
शिवाय, समीर भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी समीर भुजबळ यांच्याकडून पक्षाच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा मागितला आहे, असे सूत्रांनी सांगितले. | Sameer Bhujbal Resignation
मोठी बातमी! महाविकास आघाडीतील वाद निवळला; ‘असा’ असेल जागावाटपाचा फॉर्म्युला
आव्हाड विरुद्ध मुल्ला! अजित पवारांच्या खेळीची राजकीय वर्तुळात चर्चा…





