आव्हाड विरुद्ध मुल्ला! अजित पवारांच्या खेळीची राजकीय वर्तुळात चर्चा…

NCP AJIT PAWAR राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना, कळवा-मुंब्रा मतदारसंघातील लढत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अजित पवार यांनी येथून मोठा राजकीय डाव खेळत नजीब मुल्ला यांच्या रूपाने मुस्लिम उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. अशातच मुल्ला यांना अजित पवार यांनी AB फॉर्म दिल्याने ही लढत रंजक होणार आहे.
नजीब मुल्ला यांना उमेदवारी
सोमवारी अजित पवारांनी १७ उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले, ज्यात नजीब मुल्ला यांचा समावेश आहे. 28 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाड देखील याच दिवशी आपला अर्ज दाखल करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील दोघांमध्ये थेट सामना होण्याची शक्यता आहे.
मुल्ला विरुद्ध आव्हाड | NCP AJIT PAWAR
नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्राच्या विकास निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यापूर्वी मुल्ला यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी, आव्हाड आणि मुल्ला समर्थकांमध्ये वाद झाला होता, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
भाजपची 99 उमेदवारांची यादी | NCP AJIT PAWAR
राज्यात निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महायुतीमध्ये वादाच्या ठरत असलेल्या जागा मात्र भाजपने पहिल्या यादीतून वगळल्या आहेत.
दुसरीकडे, महायुतीचे घटक असलेले अजित पवार देखील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थेट AB फॉर्म देत उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत आहेत.





