“भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त”; संबित पात्रांच्या विधानानंतर नवा वाद

Sambit Patra । भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी “भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत,” अशा प्रकारचे धक्कादायक विधान केले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय. एका ओडिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे यावरून विरोधकांनीही भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केलाय .
हा ईश्वराचा अपमान Sambit Patra ।
संबित पात्रा यांनी केलेल्या विधानावरून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली. महाप्रभू श्री जगन्नाथ हे साऱ्या विश्वाचे भगवान आहेत. अशा महाप्रभूंना एका व्यक्तीचा भक्त म्हणणे म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. या विधानांमुळे जगभरातील जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान जगन्नाथ हे ओडिया अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यामुळे संबित पात्रा यांनी केले विधान निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Mahaprabhu Shree Jagannatha is the Lord of Universe.
Calling Mahaprabhu a bhakt of another human being is an insult to the Lord. This has hurt the sentiments and demeaned the faith of crores of Jagannatha bhaktas and Odias across the world.
The Lord is the greatest Symbol of…
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) May 20, 2024
हे लोक स्वतःला देवापेक्षा मोठे समजू लागले
तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनीही या विधानावरून भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो. हे लोक स्वतःला देवापेक्षा मोठे समजू लागले आहेत. देवाला मोदी भक्त म्हणणे हा देवाचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.
I strongly condemn this statement of BJP. They have started thinking that they are above God. This is height of arrogance. Calling God bhakt of Modi ji is an insult to God. https://t.co/cOP23BpOqh
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 20, 2024
याबरोबर काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनीही सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत भाजपाला घेण्याचा प्रयत्न केला. हे प्रभू या लोकांना माफ करा, असे कॅप्शन देत त्यांनी संबित पात्र यांच्यावर टीका केली.





