Sambhajiraje Chhatrapati | लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणूकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती सरकारकडून तयारी सुरू झाली आहे. यातच आता तिसऱ्या आघाडीसाठी देखील प्रयत्न केले जात आहे. यादरम्यान स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना तिसऱ्या आघाडीत येण्याची विनंती करण्यासाठी भेट घेतली होती, अशी माहिती संभाजीराजे यांनी धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
संभाजीराजे काय म्हणाले?
संभाजीराजे म्हणाले की, “राज्यात सध्या सगळे प्रश्न बिकट आहेत. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या आघाडीत यावं. त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली होती.” Sambhajiraje Chhatrapati |
पुढे ते म्हणाले, “राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात कसे टिकते याबाबत ही मला शंका आहे. फार गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावर ही प्रश्न उपस्थित केला आहे. एवढेच नाही माझ्या हातात राज्य आल्यानंतर मी आरक्षणाचा गुंता सोडवतो. मी छत्रपती शाहू महाराजांचा नातू आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं तसा देण्याचा प्रयत्न करू शकतो,” असा विश्वासही संभाजीराजे यांनी दिला. Sambhajiraje Chhatrapati |
यावर आता मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी संभाजीराजे छत्रपती पुढील दोन दिवस करणार आहेत. Sambhajiraje Chhatrapati |
हेही वाचा:
ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चित्रपटाने रिलीजआधीच कमावले करोडो रुपये