Devara OTT Deal | साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर ॲक्शन ड्रामा फिल्म ‘देवरा’ मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील जान्हवी आणि एनटीआरच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय यातील गाण्यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे.
ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट ‘देवरा’ने रिलीजपूर्वीच रेकॉर्ड तोडले आहेत. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे डिजिटल अधिकार 150 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत, जे दक्षिण चित्रपटांमध्ये सर्वाधिक आहे. यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचा एकूण रनटाइम 3 तास 10 मिनिटे निश्चित केला होता.
‘देवरा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या १५००० तिकिटांची बुकिंग प्रदर्शित होण्यापूर्वी झाली आहे. यूएसमध्ये चित्रपटाच्या प्री-सेल कलेक्शनने दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, यामुळे चित्रपटाची 1 मिलियन डॉलरची ओपनिंग मेकर्सकडून निश्चित मानली जात आहे.
जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा टॉलिवूडमध्ये डेब्यू
दरम्यान, या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता सैफ अली खान या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. रम्या कृष्णा, प्रकाश राज, श्रीकांत, श्रुती मराठे, नारायण, शाइन टॉम चाको आणि अभिमयू सिंग हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहेत. Devara OTT Deal |
‘देवरा’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी टॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट देवरा पार्ट 1 कोरतला सिवा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
‘भारतात आता पंतप्रधान मोदींना कोणी घाबरत नाही…’ ; राहुल गांधींचा अमेरिकेतून भाजप अन् संघावर हल्लाबोल