Sambhaji Chhatrapati : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छ. संभाजीराजेंची भली मोठी पोस्ट चर्चेत ! काय म्हणाले पाहा….

Sambhaji Chhatrapati | Dhananjay Munde : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.त्यांनी राजीनामा देण्याचे कारण सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचे म्हटले आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया देताना ट्विट केले यामध्ये त्यांनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे म्हटले.
यावरूनच आता सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली असून, अश्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आपलं मत मांडलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हंटलं की, “संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे.
या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती.
मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे ! असं त्यांची म्हंटलं आहे.
धनंजय मुंडेंचे ट्वीट
“बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.
तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे,’ असे धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.





