समंथा रुथ प्रभूचे हेल्थवर भाष्य; म्हणाली “मी आता आधीपेक्षा जास्त आनंदी”

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती दिग्दर्शक राज निदीमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय मागील काही दिवसांपासून समंथा मायोसायटिस आजाराचाही सामना करत आहे.
नुकतंच तिने तिच्या हेल्थवर भाष्य करत ती आता पूर्वीपेक्षा खूपच मजबूत झाली आहे. तसेच आता तिचा जीवन आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे नवीन झाल्याचे तिने सांगितले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान समंथा रुथ प्रभू म्हणाली की, “मी सुरुवातीला वर्षाला पाच सिनेमे करायचे. कारण हीच यशस्वी अभिनेत्रीची ओळख होती. पाच फिल्म्स, एक मोठी ब्लॉकबस्टर आणि टॉप १० अभिनेत्रींमध्ये येण्याची स्पर्धा असं सगळं होतं आणि एवढेच महत्त्वाचे होते. काही मोठे मल्टिनॅशनल ब्रँड्ससोबत कोलॅबही व्हायचंय.” Samantha Ruth Prabhu |
ती पुढे म्हणाली, “आज माझा दोन वर्षात एक सिनेमा येतो आणि मी कोणत्याही यादीतही येत नाही. माझ्याकडे १००० कोटींचा बिग बजेट सिनेमाही नाही. पण मी उलट आता आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. मी खूप कमजोर झाले होते. प्रत्येक शुक्रवारी चित्र वेगळं असायचं. मला चिंता सतावायची की, उद्या कोणी येईल आणि माझी जागा घेईन. मी त्या एका शुक्रवारवर माझी किंमत ठरवायचे.” समंथा शेवटची ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत वरुण धवन होता. Samantha Ruth Prabhu |
हेही वाचा:
Daily Health Tips : दिवसभर ताजेतवाने राहायचंय? सकाळच्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात!





