समांथा पुन्हा प्रेमात? प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट, दुबईतील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. समांथाने तिच्या दुबई ट्रिपचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यानंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
समांथा दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याचं म्हटलं जातं आहे. दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. समांथा अनेकदा सोशल मीडियावर राज निदिमोरूसोबतचे फोटो शेअर करते. परंतु दोघांनीही डेटिंगच्या बातम्यांवर मौन बाळगले आहे.
व्हिडिओतील एका क्लिपने वेधलं लक्ष
दरम्यान, समांथा दुबईमध्ये क्रेशा बजाज या डिझायनरच्या एका फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान तिने एक रील शेअर केले आहे. या व्हिडिओतील काही सेकंदाच्या एका क्लिपने सर्वाधिक लक्ष वेधले. ज्यामध्ये तिने एका पुरूषाचा हात घट्ट पकडला आहे. हा हात राज निदिमोरूचा हात असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून राज आणि समांथा यांच्या नात्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मी जे पाहिलेले आणि त्या विरुद्ध तू जे पाहिले ते’. समंथाने ट्रिपमधील विविध आनंदी क्षण शेअर केले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समंथाला एवढं पहिल्यांदा दिलखुलास हसताना पाहिल्याचं चाहत्यांनी म्हंटलं आहे. हा व्हिडीओ आणि हा क्षण पाहून चाहत्यांचा असा विश्वास आहे की, सामंथाच्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तिचा कथित बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरूच आहे. Samantha Ruth Prabhu |
राज निदिमोरू विवाहित असल्याचं म्हटलं जातं. राजने 2015 मध्ये श्यामली डेशी लग्न केले होते. मात्र दोघेही 2022 मध्ये वेगळे झाले. परंतु दोघांनीही घटस्फोटाबद्दल कधीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Samantha Ruth Prabhu |
समंथा रूथ प्रभूने नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केलं. त्यानंतर आता समंथाच्या देखील अफेरच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:
“नरेंद्र मोदींसारखा नेता देशाचे..” ; GST कर रचनेतील बदलानंतर पीयूष गोयल यांची पहिली प्रतिक्रिया





