समाजवादी पक्ष आणि औरंगजेबाची प्रवृत्ती सारखीच; योगी सरकारमधील ‘या’ मंत्र्याची टीका

लखनौ : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सुरू असलेला वाद वाढतच चालला आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनी याबाबत समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाचा इतिहास देशाचे विभाजन करण्याचा आहे. अशा लोकांना पूर्णपणे नष्ट केले पाहिजे. जर त्याच्या कबरीवर सजदा (प्रार्थना) केली गेली तर ते देशासाठी खूप लज्जास्पद असेल असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.
एका माध्यमाशी बोलताना कपिलदेव अग्रवाल म्हणाले की, औरंगजेबाचा इतिहास खूप कुप्रसिद्ध आहे. तो देश तोडणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला कठोर शिक्षा दिली आणि त्याला हाकलून लावले. पण जर औरंगजेबाचे गोडवे गायले जात असतील, जर त्याच्या कबरीवर सजदा केली जात असेल तर ही भारतासाठी शरमेची बाब आहे.
यावेळी अग्रवाल यांनी संभळमधील नेजा मेळ्याबाबत विरोधकांवर हल्लाबोल केला आणि संभळमधील महमूद गाजी हाही देश तोडणारा होता. सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणारा महमूद गझनी हा त्याचा पुतण्या होता, म्हणून आज प्रशासनाने ती जत्रा थांबवण्याची कारवाई केली. आता हे सरकार ते सरकार नाही जे आक्रमकांच्या कबरींवर मेळे भरवत असे. अखिलेश यादव यांनी तर जिना यांचे कौतुक केले. जर देशाचे विभाजन करणाऱ्या व्यक्तीचा आमदार औरंगजेबाची स्तुती करत असेल तर फरक काय? हे एकाच प्रवृत्तीचे लोक आहेत.
ज्यांनी परदेशी शासक म्हणून देशावर राज्य केले आणि देशाचे विभाजन करण्याचे काम केले, अशा लोकांची नावे भारतातून पुसून टाकली पाहिजेत. भारतातील मुस्लिम हे असे लोक आहेत ज्यांनी औरंगजेबासारख्या आक्रमकांच्या तलवारीसमोर शरणागती पत्करली आणि धर्म बदलला. भारतातील मुस्लिम हेच ते मुस्लिम आहेत. अशा लोकांनी हे मान्य करावे की आपले पूर्वज हिंदू होते, औरंगजेब त्यांचा पूर्वज नाही. आम्ही त्या लोकांवर बहिष्कार घालत आहोत आणि इतर देशांमधून आलेल्यांना पाठिंबा देत आहेत व त्यांचे समर्थन करत आहेत.





