Salon Price Hike : केसांची कात्री खिशाला लागणार! 1 जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये होणार ‘एवढी’ वाढ

मुंबई : नवीन वर्षात केशकर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनचे रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोशिएशनकडून घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
का करण्यात येणार दरवाढ?
1 जानेवारी 2025 या नवीन सालापासून मुंबई सह सर्व महाराष्ट्रात सलूनमधील हेअर कट, शेविंग त्याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावरती किमान 20 ते 30 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. याबाबत सलून व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे. वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स ,प्रोफेशनल टॅक्स, महानगरपालिकेच्या वाढती लायसन फी, सलून उपयोगी वस्तू चा वाढता दर ,वाढत चाललेले हप्ते या सर्व गोष्टींमुळे त्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुठल्या गोष्टींचे दर किती वाढणार?
हेअर कट- 20 टक्के वाढ
दाढी- 20 टक्के वाढ
हेअर कलर- 30 टक्के वाढ
क्लीन अप,फेशियल अँड डी टॅन- 30 टक्के वाढ
स्मुथनिंग अँड कॅरीटीन- 30 टक्के वाढ
हेड मसाज, मेनिक्यूर, पेडीक्युर- 30 टक्के वाढ





