सलमानचा ‘राधे’ अडचणीत; सुशांतच्या फॅन्सकडून ‘बॉयकॉटराधे’चा ट्रँड व्हायरल
Updated On:

सलमान खानचा “राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला आहे. रिलीजनंतर हा चित्रपट जबरदस्त चर्चेत आला आहे. प्रेषकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाइन गर्दी केली आहे.
मात्र, ट्विटरवर राधे या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. “बॉयकॉटराधे’ माध्यमातून बहिष्कार घालण्याची मागणी होत आहेत.
हा ट्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी ट्विटरवरून सुरू केला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याचे चाहते बॉलीवूडच्या काही कलाकारांवर नाराज आहेत. सलमान खानदेखील या कलाकारांपैकी एक आहे.
अशा परिस्थितीत सलमान खानचा राधे हा चित्रपट बऱ्याच दिवसांनंतर प्रदर्शित झाला असताना, त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तरीसुद्धा ईदनिमित्त प्रदर्शित झालेल्या “राधे’ला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.





