मुंबई – सध्या तरी देशावरील कोरोनाचे संकट थोडे का होईना कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या याच संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपेक्षा जास्त संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये होता. यावेळी सर्वसान्यांप्रमाणे सिनेकलाकार सुद्धा आपल्या घरातच बसून होते.
दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने उघडे आहेत. आणि आता यामध्येच दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे. यामध्ये सलमान खानचा ‘राधे’ आणि अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ चा समावेश आहे.
हे दोन्ही बडे चित्रपट मे महिन्यात ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. ‘सत्यमेव जयते-2’ हा चित्रपट 14 मे 2021 रोजी रुपेरी पडद्यावर झळकरणार आहे. तर सलमान खानने आपल्या ‘राधे’ चित्रपटाची रिलीज डेट अद्यापतरी जाहीर केलेली नाही. ‘सत्यमेव जयते-2’ हा चित्रपट भ्रष्टाचारावर आधारित असणार आहे.