सलमान खानच्या बरगड्यांना दुखापत; चाहते चिंतेत

Salman Khan । दबंग सलमान खान त्याच्या कामाच्या कमिटमेंटबद्दल खूप गंभीर आहे. नुकताच तो जखमी असूनही एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. सलमान खानच्या या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान खानचे चाहते त्याची काळजी करत आहेत.
सलमान खानने गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात सलमान टी-शर्ट आणि जीन्समध्ये देखणा दिसत होता. त्याने चष्माही लावला होता. यादरम्यानचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये त्याला सोफ्यावरून उठताना त्रास होत आहे.
Get well soon Bhai. 🥺♥️
So #SalmanKhan‘s unexpected Rib injury is the reason why #Sikandar filming has paused as of now. pic.twitter.com/s9UGUZqZuL
— Mohammed Sohail ♐ (@ItsSohailM) August 28, 2024
अशी माहिती समोर येत आहे की, सलमान खानच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. पण तरीही तो कार्यक्रमाला उपस्थित राहिला. सलमानच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही दिसत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस सांगत आहेत की जखमी असूनही सलमान खान या कार्यक्रमाचा एक भाग बनला होता. यावरून त्यांची पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. सलमान खानचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तो लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. या कार्यक्रमात सलमानने जलवा गाण्यावर डान्सही केला होता. त्यांच्या डान्सने सर्वांचे मन जिंकले. या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली बेंद्रे उपस्थित होती.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो सिकंदर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एआर मुरुगादास या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. प्रतिक बब्बर आणि सत्यराज यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.





