सलमान खानचा अॅक्शन मोड; ‘सिकंदर’चा जबरदस्त टीझर रिलीज

Salman Khans Sikandar Teaser Release | बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा नुकताच 59 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर त्याच्या बहूप्रतिक्षित असलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सलमानने त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. सध्या या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
सलमानने वाढदिवसाच्या दिवशी हा टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याने त्याने हा निर्णय पुढे ढकलला. आता अखेर ‘सिकंदर’ चा टिझर प्रदर्शित झाला आहे.
या टीझरमध्ये सलमानची एंट्री होत असल्याचे दिसते. तेव्हा त्या हॉलमध्ये आजूबाजूला खुप हत्यारं आणि समोर सैनिकांचे मुखवटे, पोशाख दिसतात. जसा सलमान पुढे जातो, ते मुखवटे घातलेल्या पोशाखांमधली माणसं त्याला मारायला येतात. यात सलमान नवीन अवतारात पाहायला मिळत आहे. Salman Khans Sikandar Teaser Release |
सलमान खान त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. निर्मात्यांनी अलीकडेच त्याचे फर्स्ट-लूक पोस्टर रिलीज केले होते, ज्याने सलमानच्या चाहत्यांचा उत्साह वाढला होता.
दरम्यान, या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी असल्याचं बोललं जातं आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून एआर मुरुगदास दिग्दर्शित केले आहे. यात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे. Salman Khans Sikandar Teaser Release |
हेही वाचा:
New Year Resolution 2025: नववर्षात करा ‘हे’ 5 संकल्प, 2025 ठरले तुमच्यासाठी खास





