Har Ghar Tiranga सलमान खानने गॅलॅक्सि अपार्टमेंटमध्ये फडकवला तिरंगा

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या आपल्या आगामी टायगर ३ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमध्ये आता सलमान देखील सामील झाला आहे. नुकतंच पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान करत आमिर खानने आपल्या घरावर तिरंगा लावला होता, आता या यादीत सलमान खानचेही नाव समाविष्ट झाले आहे.
भारत या वर्षी मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. या सोहळ्याला आणखी खास बनवण्यासाठी पीएम मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येक देशवासियांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. बॉलिवूडमधून देखील पंतप्रधानांच्या या आवाहनाला मोठा पाठींबा मिळताना पाहायला मिळतोय.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सामील झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, सलमानने मुंबईतील त्यांच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तिरंगा फडकवला. सलमान खान व्यतिरिक्त, मोहिमेत अमिताभ बच्चन, आमिर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, हृतिक रोशन, अक्षय कुमार, कंगना राणावत अशा इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.





