फिल्म प्रॉडक्शन सुरू करणाऱ्या बड्या कलाकारांमध्ये अक्षयकुमार, अजय देवगण, अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्राचा समावेश आहे. आमीर खान आणि शाहरुख खानने तर कित्येक वर्षांपासून प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. आता त्यामध्ये सलमानचीही भर पडली आहे.
View this post on Instagram
सलमान खाननेही इतर कलाकारांप्रमाणे प्रोड्युसर होण्याचे ठरवले आहे. त्याने “सलमान खान फिल्म्स’ नावाने एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. आता या बॅनरखाली त्याने एका वेब सीरिजचे प्रॉडक्शन सुरू केले आहे. “92 डेज’ असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे आणि त्यातील लीड रोल सलमानची बहीण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा करणार आहे.
ही सीरिज एक रोड ट्रिपची कहाणी असणार आहे. आग्रापासून सुरू होणारी कथा मथुरा, मुरैना, ग्वाल्हेर, चंबळ, इंदौरच्या परिसरात घडणार आहे. या वेबसीरिजमध्ये सलमानदेखील छोटी भूमिका साकारणार आहे. मात्र, त्याचे स्वरूप अद्याप निश्चित झालेले नाही.