Pimpri Chinchwad News : महापारेषण कंपनीच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग
Pimpri Chinchwad News : चिंचवड येथे महापारेषण कंपनीचे २२० केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब वीज उपकेंद्र आहे. याच उपकेंद्रामध्ये आज (दि. ६) दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास २२ केव्ही सीटी व ब्रेकर मध्ये स्फोट होऊन आग लागली.

पिंपरी : महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसराला या बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. आग नियंत्रणात आली असून, बिघाड झालेला भाग बंद ठेवून बाकीचा भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण व महापारेषणचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.
चिंचवड येथे महापारेषण कंपनीचे २२० केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब वीज उपकेंद्र आहे. याच उपकेंद्रामध्ये आज (दि. ६) दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास २२ केव्ही सीटी व ब्रेकर मध्ये स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे उपकेंद्रात मोठा आग ठोंब उसळला. महावितरणला वीजपुरवठा करणारे अनेक २२ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वाहिन्या बाधित झाल्याने पिंपरी चिंचवडचा बहुतांश भाग, प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे तत्सम भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
महापारेषण कंपनीकडून बिघाड झालेला भाग वगळता उर्वरित भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. तर महावितरणकडून शक्य तितक्या लवकर पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.





