Salaar : ‘याने बॉक्स ऑफिसवर आग लावली….’; सालारच्या ग्रँड ओपनिंगवर चिरंजीवी खुश !

Salaar : प्रभासच्या सालारने (Salaar) रिलीज झाल्यापासून सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी त्याने आपली जादू दाखवली आहे. आगाऊ बुकिंगमध्ये शाहरुखच्या ‘डंकी’ला मागे टाकणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाल केली.
270 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या प्रशांत नीलच्या या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येच जवळपास 50 कोटींचा व्यवसाय केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सालार’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी एकट्या भारतात 95 कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय केला आहे.
जर आपण एकूण कलेक्शनबद्दल बोललो तर प्रभासने या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर सालारने पहिल्याच दिवशी 175 कोटी रुपयांचा मजबूत आकडा गाठला आहे. हा चित्रपट प्रभासच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.
साऊथचा मेगास्टार चिरंजीवी ( Chiranjeevi) देखील प्रभासच्या चित्रपटाला मिळत असलेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे खूप खूश आहे आणि त्याने चित्रपटाच्या टीमचे आणि ‘देवा’चे सोशल मीडियावर अभिनंदनही केले आहे. चिरंजीवीने ट्विटरवर लिहिले, “माझ्या प्रिय ‘देवा’ प्रभासचे हार्दिक अभिनंदन. सालार: भाग एक – सीझफायरने बॉक्स ऑफिसवर आग लावली आहे.
Heartiest Congratulations my dear ‘Deva’ #RebelStar #Prabhas 🤗#SalaarCeaseFire has put the Box Office on Fire 🔥🔥
Kudos to Director #PrashanthNeel on this remarkable achievement. You truly excel at world building.
My love to the Superb ‘Varadaraja Mannar’ @PrithviOfficial…
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) December 23, 2023
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिग्दर्शक प्रशांत नील यांचे अभिनंदन. तुम्ही खरोखरच उत्कृष्ट आहात, तेजस्वी ‘वरधराजा मन्नर’, ‘आद्या’ श्रुतिहासन आणि ‘कर्था’ भाई यांना माझे प्रेम आणि या शानदार यशाबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन!’ या आशयाची पोस्ट चिरंजीवी यांनी केली आहे.
‘सालार’ने मोडला बिग बजेट सिनेमांचा रेकॉर्ड!
‘सालार’ या सिनेमाने ओपनिंग डेला 95 कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग डेलाच या सिनेमाने ‘पठाण’ (Pathaan), ‘जवान’सह (Jawan) ‘डंकी’चाही (Dunki) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा वर्षातला मोठा ओपनर ठरला आहे.





