Sakshi Priya Gold : ग्लास्गोच्या रिंगमध्ये भारताचा ‘सुवर्ण’ पाऊस! साक्षी अन् प्रियाच्या गोल्डन पंचने इंग्लंड-कॅनडाचे बॉक्सर गारद
Sakshi Priya Gold : आज भारतीय बॉक्सरांनी रिंगमध्ये थेट सुवर्णपदकांची बरसात केली. भारताने आज जिंकलेल्या एकूण ५ सुवर्णपदकांपैकी तब्बल ४ सुवर्णपदके एकट्या बॉक्सिंगमधून आली आहेत.

Sakshi Chaudhary Priya Ghanghas Win Gold Medals Boxing CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा (CWG 2026) १० वा दिवस भारतीय क्रीडा जगतासाठी अत्यंत सुवर्णमय आणि ऐतिहासिक ठरला आहे. आज भारतीय बॉक्सरांनी रिंगमध्ये थेट सुवर्णपदकांची बरसात केली. भारताने आज जिंकलेल्या एकूण ५ सुवर्णपदकांपैकी तब्बल ४ सुवर्णपदके एकट्या बॉक्सिंगमधून आली आहेत. भारताची स्टार बॉक्सर साक्षी चौधरी (Sakshi Chaudhary) आणि प्रिया घंघास (Priya Ghanghas) यांनी आपापल्या वजनी गटाच्या फायनलमध्ये बाजी मारत भारताला दोन नवी सुवर्णपदके मिळवून दिली.
साक्षी चौधरीचा ५-० असा एकतर्फी विजय!
महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात साक्षी चौधरीने इंग्लंडच्या रुबी व्हाईट हिचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. साक्षीने सामन्याच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये पूर्ण वर्चस्व राखत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. पंचांनी सर्वसंमतीने साक्षीच्या बाजूने कौल दिला. पराभवाच्या भावनेने इंग्लिश बॉक्सरच्या डोळ्यात अश्रू आले, तर साक्षीने तिरंगा उंचावत जल्लोष केला. हे भारताचे बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्ण ठरले.
#WATCH | Glasgow, Scotland | Indian boxer Sakshi Chaudhary clinched the gold medal in the Women’s 51kg category at the Commonwealth Games
She says, “I am feeling very proud after winning the Gold medal…My target was to win the Gold medal for the nation…I thank all the people… pic.twitter.com/6fIApsxmkw
— ANI (@ANI) August 1, 2026
पहिला राऊंड गमावूनही प्रियाची ‘गोल्डन’ वापसी!
GOLD FOR INDIA!🥇
Nothing between them for three rounds. The judges give it to India’s Priya Priya over Canada’s Marie-Bathoul Al-Ahmadieh. 🇮🇳🥊 pic.twitter.com/0rtqYes1B7
— Glasgow 2026 (@Glasgow_2026) August 1, 2026
महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये प्रिया घंघासचा सामना कॅनडाच्या मॅरी बाथेल अल अहमदीशी झाला. सामन्याची पहिली फेरी कॅनडाच्या खेळाडूने जिंकली होती, पण प्रियाने हार न मानता पुढच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले. तिने दुसरा राऊंड ४-१ ने जिंकला आणि अंतिम निकाल ४-१ अशा स्प्लिट (Split Decision) निर्णयाने आपल्या बाजूने फिरवून सुवर्णपदकावर कब्जा केला.
या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने चालू राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये ४ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले आहे.





