साजिद खानला बिग बॉस 16 मध्ये कास्ट केल्यामुळे शर्लिन चोप्रा संतापली म्हणाली,’सलमानच्या बहिणीसोबत…’

मुंबई – अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करून MeToo चा आरोप झालेला चित्रपट निर्माता साजिद खानवर पुन्हा एकादा अभिनेत्री शर्लिन चोप्राने संताप व्यक्त केला आहे.
शर्लिन चोप्राने मीडियाशी बोलतांना सांगितले की,’साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी तिच्या वकिलांनी ‘एंडमॉल शाइन प्रायव्हेट इंडिया लिमिटेड’ आणि बिग बॉस बनवणाऱ्या सलमान खानला कायदेशीर नोटीस पाठवली होती.’
शर्लिनचा दावा आहे की,’2005 मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच ती खूप अस्वस्थ होती, तेव्हा साजिद खानने तिला चित्रपटाची ऑफर देण्याच्या बहाण्याने बोलावले आणि लैंगिक शोषण केले.
साजिदला बिग बॉसच्या घरात घेतल्याबद्दल शर्लिनने शो होस्ट सलमान खानवर नाराजीही व्यक्त केली आणि म्हणाली, ‘अखेर सलमान खानला लैंगिक शोषणाच्या आरोपीला घरात घेऊन जाण्याची काय गरज होती?
शर्लिन म्हणाली की, जर साजिदने सलमानच्या बहिणीसोबत हे केले असते तर साजिदला बिग बॉसच्या घरात घेतले असते का? शर्लिन म्हणते की, सलमानला हवे असते तर साजिद आज बिग बॉसचा भाग झाला नसता.’
शर्लिनने असेही म्हटले आहे की,’लैंगिक शोषण झालेल्या मुलींना बिग बॉसच्या घरात का बोलावले जात नाही, त्यांना थेट साजिदला प्रश्न विचारण्याची संधी का दिली जात नाही?’





