#AllEnglandOpen2020 : सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात
Updated On:

बर्मिगहॅम : भारताची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सलामीलाच पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ऑलिम्पिक पात्रतेच्या सायनाच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
पहिल्या फेरीच्या सामन्यात सायनावर तिसऱ्या क्रमाकांच्या जपानच्या आकाने यामागुचीने 21-11, 21-08 असा विजय मिळवला. ही लढत 28 मिनिटे चालली.
या पराभवामुळे ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी सायनाला येत्या महत्वाच्या (स्विस ओपन, इंडिया ओपन, मलेशिया ओपन) स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान, ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ही बॅडमिंटन विश्वात मानाची समजली जाते. पण, या स्पर्धेत सायनाला सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेच्या तिच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.





