सई ताम्हणकरचे ब्रेकअप? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटात देखील तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांसह सई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सई ताम्हणकर आणि निर्माता अनिश जोग हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. या दोघांचे एकत्र फोटोही समोर आले होते. मात्र आता या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सईच्या इनस्टाग्रामवरील एका पोस्टनंतर रंगल्या आहेत.
सईने दौलतराव सापडला असं म्हणत अनिशचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. आता सईने #Trustory म्हणत एक स्टेटस शेअर केलं आहे. ‘मी स्वत:च्या चॉईसने सिंगल आहे. ही माझी निवड नाही पण आता ही माझी निवड आहे,’ असे सईने म्हटले आहे. आता सईच्या एका पोस्टमुळे यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला असल्याचं म्हटलं जातंय. तसेच तिने अनिशसोबतचे फोटोही तिच्या सोशल मीडियावरुन काढून टाकले आहेत. Sai Tamhankar |
View this post on Instagram
दरम्यान, सईचे याआधी लग्न झाले होते. पण काही कारणास्तव त्यांचं हे नात फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर सई बराच काळ सिंगल होती. पण मागील अनेक दिवसांपासून सई आणि अनिश एकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जात होतं. नुकतच त्यांनी दिग्दर्शक, अभिनेता समीर विद्वंस याच्याही लग्नाला एकत्र हजेरी लावली होती. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु अधिकृत रित्या याबाबत सईने सांगितलेलं नाही. Sai Tamhankar |
हेही वाचा :
महायुतीत खटके उडणार? ; नवाब मलिक अजित पवारांसोबत एकाच मंचावर, काय म्हणाले फडणवीस? वाचा





