“…पण लोकांसाठी तो एक.. “; त्या भूमिकांबद्दल सई ताम्हणकर स्पष्टच बोलली…

Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं . सईने २००८ साली रिलीज झालेल्या ‘सनई चौघडे’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. पुढं तिने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमे केले. सईचा मोठा चाहतावर्ग असून, ती नेहमी आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असते.
‘नो एंन्ट्री’: पुढे धोका आहे नावाच्या सिनेमात तिने बिकनी शॅाट दिला होता. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. याशिवाय हिंदी सिनेमात तिने दिलेल्या किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. त्या सिनेमाचं नाव हंटर होतं. या दोन्ही सिनेमातील सीनविषयी सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
तो केवळ माझ्या कामाचा एक भाग होता
नो एंन्ट्री सिनेमातील बिकनी सीनविषयी बोलताना सई म्हणाली, “हा सीन माझ्या चाहत्यांसाठी धक्कादायक असला तरी, माझ्या जागी दुसरी कोणीही असती, तर लोकांनी तिलाही स्वीकारलं असतं, जसं त्यांनी मला स्वीकारलं.” पुढं ती म्हणाली, “एखादी मुलगी स्विमिंग करत असताना स्विमसूट घालणं माझ्यासाठी खूप सामान्य होतं. पण लोकांसाठी तो एक बोल्ड सीन होता. तो केवळ माझ्या कामाचा एक भाग होता, आणि ही मर्यादा ओलांडून पुढे जाणं माझ्यासाठी गरजेचं होतं.”
तो माझ्यासाठी एक बोल्ड सीन नव्हता
हंटर या हिंदी सिनेमातील बोल्ड आणि किसिंग सीनबद्दल बोलताना सई म्हणाली, “जर तुम्ही ‘लोक काय म्हणतील?’ असा विचार करणार असाल, तर अभिनेत्री म्हणून काम करणं शक्य नाही.” तुम्हाला ते स्वीकारायला हवं, असं सईने स्पष्ट केलं. तो सीन चित्रपटाच्या शूटिंगनंतर एक वर्षाने शूट झाला होता, त्यामुळे तो माझ्यासाठी एक बोल्ड सीन नव्हता, तर माझ्या कामाचा भाग होता.” असं सईने सांगितलं. सई ताम्हणकर शेवटची गुलकंद, ग्राउंड झिरो या सिनेमात झळकली होती. तिच्या चाहत्यांना आता तिच्या आगामी सिनेमांची उत्सुकता लागलेली आहे.
हेही वाचा : ट्रम्प यांचा भारताला आणखी एक झटका; H-1B व्हिसाबाबत घेतला मोठा निर्णय; अमेरिकेत जाणं महागणार…





