Pune News : सह्याद्री स्कूलच्या सई मिसाळची क्रीडा क्षेत्रात भरारी; जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक
Pune News : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे माळवाडी येथील विद्यार्थिनी सई विशाल मिसाळ हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Pune News : पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे माळवाडी येथील विद्यार्थिनी सई विशाल मिसाळ हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सईने जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर विभागीय (झोनल) स्पर्धेत कांस्यपदक मिळवत आपल्या यशात आणखी भर घातली. (Pune News)
मेहनत आणि सरावाच्या जोरावर यश
सई बालेवाडी येथील स्टेट सेंटरमध्ये प्रशिक्षक प्रवीण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि सरावाला या यशाच्या रूपाने फळ मिळाले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक आणि विभागीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याने सईचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Pune News)
शाळेच्या वतीने अभिनंदन
सईच्या या यशाबद्दल सह्याद्री नॅशनल स्कूलचे संस्थापक विजय बारटे सर, मुख्याध्यापिका शुभदा देशमुख आणि क्रीडा शिक्षक महेंद्र गोकुळे सर यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी क्रीडा स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या. (Pune News)
सईच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Pune News)






