धीरज साहू म्हणजे गांधी कुटुंबाचे एटीएम ! बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

नवी दिल्ली – काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या आवारात आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर सापडलेल्या रोखीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. छाप्यात ३५० कोटी रुपयांची रोकड सापडली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी साहूंविरोधात जोरदार वक्तव्ये केली आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जगाला माहित आहे की साहू म्हणजे गांधी घराण्याचे एटीएम होते.
प्रधान म्हणाले, आपल्या ओडिशात एक म्हण आहे की, मंदिराच्या आत कोण आहे? तर उत्तर येते की मी केळी खाल्ली नाही. धीरज साहू हे काँग्रेस पक्षाकडून तिसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार आहेत. साहू हे गांधी घराण्याचे एटीएम होते हे जगाला माहीत आहे. ते पक्षाचे एटीएम होते असे आम्ही म्हणत नाही, लोक म्हणतात ते गांधी घराण्याचे एटीएम होते.
वादग्रस्त आणि बेहिशोबी रकमेबाबत तब्बल आठवडाभरानंतर साहू यांचे वक्तव्य आल्यावर प्रधान म्हणाले, आठवड्यानंतर साहूंचा बचाव आला आहे, जो लोकांना मान्य नाही. एजन्सी आपले काम करत आहे, तिला करू द्या. पण प्रश्न असा पडतो की, हा पैसा येतो कुठून? साहू हे गांधी परिवारासोबत फोटो काढत होते आणि नंतर लोकांवर दबाव टाकत होते. प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि व्यवसायाबद्दल माहिती आहे.





