मुंबई : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरुप या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदा 21 भाषांमधील साहित्यिकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली भावना पुरस्कार मिळाल्यानंतर सुधीर रसाळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हा पुरस्कार भारतात सर्वात सन्मानाचा पुरस्कार आहे. माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त समाधान या पुस्काराने मिळवून दिलं आहे. मोठ मोठे समीक्षक, विचारवंत यांना या पुरस्कार देण्यात आला आहे. तेव्हा अशा मोठ्या माणसांसोबत आपलं नाव जोडलं गेलंय याचा आनंद आहे असे डॉ. सुधीर रसाळ म्हणाले. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदाच्या वर्षासाठी जी पुस्तकं पाठवण्यात आली होती, ती सगळीच तुल्यबळ होती. नदिष्ठ, भुरा, बौन हा सौमित्र यांचा कवितासंग्रह होता, अभिराम भडकमकरांच्या इन्शाअल्लाह ही कांदबरी होती, अशा 12 पुस्तकांमधून विंदांचं जे समीक्षात्मक पुस्तक आहे, त्याची निवड करण्यात आली आहे.