कृष्णात खोतांना ‘रिंगाण’साठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली – नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
कमानी सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा सादरीकरण सोहळा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. ओडिसा राज्याच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कमानी ऑडिटोरियम येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुसुम शर्मा तसेच सचिव, के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते.
देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 साठी साहित्य पुरस्कार सोहळा पार पडला.
अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.





