Sahar Shaikh AIMIM : ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 चर्चेत होता. याच प्रभागातून विजयी झाल्यानंतर सहर शेख यांच्या “कैसा हराया…” या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली होती. मात्र, आता निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे आता त्यांचं नगरसेवकपद धोक्यात असतानाच सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. सहर शेख यांचे वडील युनूस खान यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची अहवाल लवकरच येणार आहे. निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सहर शेख यांचे नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता आहे. सिद्दीकी फराह शबाब अहमद या तरुणीने सहर शेख यांच्याबाबत तक्रार केली होती. तक्रार करणारी सिद्दीकी फराह शबाब अहमद ही तरूणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार होती. प्रभाग क्रमांक ३० मधूनच ती देखील उमेदवार होती. मात्र सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. Sahar Sheikh Sahar shekh नेमकं प्रकरण काय ? सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील रहिवासी असून नंतर महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. स्थलांतरितांसाठी लागू असलेल्या नमुना 10 ऐवजी नमुना 8 चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत जातीचा दाखला मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिकाची निवडणूक लढवली, असा आरोप आहे. या संदर्भात ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. 18 मार्च रोजी झालेल्या सुनावणीस युनूस शेख अनुपस्थित राहिले, तर त्यांच्या वकिलांनी काही कागदपत्रे सादर केली. त्यानंतर 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत तहसीलदारांनी जात प्रमाणपत्रातील काही त्रुटी निदर्शनास आणल्या. दुसरीकडे, ठाण्यात वास्तव्यास असतानाही मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेण्यामागील हेतूवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. Sahar Sheikh हेही वाचा: Liver health: लिव्हर ठेवा फिट आणि मजबूत! आहारात या गोष्टी घेतल्या तर मिळेल जबरदस्त फायदा