SAFF Championship 2021 | छेत्रीने मोडला पेलेंचा विक्रम भारताची
Updated On:

नवी दिल्ली – भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या 77 गोलच्या कामगिरीला मागे टाकले व नवा विक्रम प्रस्थापित केला.
सॅफ फुटबॉल स्पर्धेतील बुधवारी झालेल्या लढतीत भारताने छेत्रीच्या कामगिरीच्या जोरावर मालदीवचा 3-1 असा सहज पराभव केला.
या लढतीत भारताच्या मनवीर सिंगने 33 व्या मिनिटाला गोल केला. मात्र, त्यानंतर 45 व्या मिनिटाला मालदीवच्या अल अश्पाकने गोल करत सामन्यात बरोबरी साधून दिली.
त्यानंतर छेत्रीने 62 व 71 व्या मिनिटाला गोल करत मालदीववर दडपण राखले व संघाचा विजय साकार केला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून या सामन्यात त्यांची नेपाळशी लढत होणार आहे.





