Vaibhav Suryavanshi Record : आयपीएल २०२६ स्पर्धेला स्फोटक सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सने (Vaibhav Suryavanshi Record) उद्घाटन सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्स आणि ४७ चेंडू राखून दणदणीत पराभव केला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत राजस्थान रॉयल्सची कामगिरी दमदार ठरली, पण या सामन्यातील खरा स्टार ठरला तो अवघ्या १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi Record). डावखुऱ्या सलामीवीराने अवघ्या १७ चेंडूत ५२ धावा ठोकल्या, ज्यात ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आयपीएल इतिहासात लक्ष वेधून घेतले. राजस्थान रॉयल्ससाठी हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले, तर आयपीएलच्या एकूण इतिहासात संयुक्त तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक झाले. Vaibhav Suryavanshi Record वैभव सूर्यवंशीचे विक्रमी पराक्रम (Vaibhav Suryavanshi Record) राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात जलद अर्धशतक १. यशस्वी जैस्वाल – १३ चेंडू (वि. केकेआर, कोलकाता २०२३) २. वैभव सूर्यवंशी – १५ चेंडू (वि. सीएसके, गुवाहाटी २०२६) ३. वैभव सूर्यवंशी – १७ चेंडू (वि. जीटी, जयपूर २०२५) ४. जोस बटलर – १८ चेंडू (वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स, दिल्ली २०१८) आयपीएल इतिहासातील तिसरे सर्वात जलद अर्धशतक वैभवने युसुफ पठाण (१५ चेंडू, २०१४), सुनील नरेन (१५ चेंडू, २०१७), निकोलस पूरन (१५ चेंडू, २०२३) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क (दोन वेळा १५ चेंडूत) यांच्यासोबत संयुक्त तिसऱ्या स्थानावर स्थान मिळवले. वैभव सूर्यवंशी यापूर्वी आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक झळकावून चर्चेत आला होता. त्यामुळे १८ चेंडूंपेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त अर्धशतक करणारा तो राजस्थान रॉयल्ससाठी पहिला खेळाडू ठरला आहे. शिवाय, आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी करत नवीन इतिहास रचला. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर सहज विजय मिळवत स्पर्धेला जोरदार सुरुवात केली आहे.