भाजपच्या टार्गेटवर आता शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता ; बड्या नेत्यावर सदाभाऊ खोत टाकणार मोठा बॉम्ब ?

Sadabhau Khot on Jayant Patil। राज्यातील महायुती सरकारकडून विरोधी पक्षाला घेरण्यासाठी सध्या मोठ्या हालचाली सुरु असल्याचे दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याला टार्गेट करण्यासाठी भाजपकडून आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत हे सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगाने विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार, गैर व्यवहार असून तत्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सदाभाऊ खोत यांच्याकडून केली आहे.
सध्या सांगली बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात असून माजी आमदार मानसिंगराव नाईक बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या सत्ताधारी पक्षाचा हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात नेमका काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या कारभारावरून लक्षवेधी Sadabhau Khot on Jayant Patil।
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकत सन 2015 ते 2021 या कालावधीतील संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडील आदेशाने तक्रारीमधील चौकशीसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखा परीक्षण) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे. सदर समितीने चौकशी करुन त्यांचा अहवाल दिनांक 16 जून, 2023 रोजी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केलेला आहे. या अहवालानुसार बँकेच्या कामकाजात अपहार, गैरव्यवहार तसेच अनियमितता व बोगस कर्ज वाटप झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
संचालक मंडळ बरखास्त ककरण्याची मागणी Sadabhau Khot on Jayant Patil।
दरम्यान, प्रत्यक्ष प्रशासकीय अहवालानुसार उघड झालेला अपहार, गैरव्यवहार व अनियमितता ही कलम 83 अन्वये झालेल्या चौकशीमध्ये सक्षमपणे मांडलेली नाही असे दिसून येत आहे. बँकेचा सखोल चौकशी सहकार खात्याकडून व्हावी, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, विद्यमान तसेच मागील संचालक मंडळावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून त्यांची वसुली करावी या मागण्या घेऊन आंदोलन होत आहे. बँकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अपहार, गैरव्यवहार होत असल्याने ठेवीदारांच्या ठेवीस व त्यांच्या विश्वासास तडा जाण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी पारदर्शकपणे होण्यासाठी सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी लक्षवेधी ते मांडणार आहेत.





