‘कधी काळी वाझेच नाही, शिंदे, फडणवीस, शाहसुद्धा आमच्या जवळचे होते. अब मुंडा बिगडा गया तो…’

Sachin Vaze on Anil Deshmukh | सचिन वाझे यांनी सध्या सुरु असणाऱ्या देशमुख विरुद्ध फडणवीस प्रकरणात मोठे विधान केले आहे. “सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत.पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे.’ असेही वाझे म्हणाले आहे. महायुतीच्या नेत्यांकडून सचिन वाझे शिवसेनेच्या जवळचे होते अशीही टीका करण्यात आली आहे यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
‘सचिन वाझे कधी काळी शिवसेनेच्या जवळ होते, यावर संजय राऊत म्हणाले की, “कधी काळी सचिन वाझेच नाही, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह सुद्धा आमच्या जवळचे होते. अब मुंडा बिगडा गया तो हम क्या करे” असं म्हणत त्यांनी प्रतिउत्तर दिल आहे. ते पुढे म्हणाले,’ मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे.’ असेही वाझे म्हणाले यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले,’भाजपाच्या लोकांची नार्को टेस्ट करा. मग समजेल 10 वर्षात त्यांनी काय कांड केलेत. अनिले देशमुख, मी, नवाब मलिक यांना ईडी, पोलिसांचा गैरवापर करुन आम्हाला अडकवलं. जयंत पाटील यांचं नाव वाझेने घेतलं.’
त्यावर राऊत म्हणाले की, “मी तुरुंगातले असे 10 लोक उभे करीन, जे फडणवीसांच नाव घेतील. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन सांगितलं की, पाहिजे की, अशा गुंडाच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेऊ नका. हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे, पण ते टाळ्या वाजवत आहेत’ असं म्हणत त्यांनी पलटवार केला.





