Sachin Pilgaonkar : “मला संधी मिळाली यासाठी मी…”; धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकर म्हणाले, पोस्ट चर्चेत !

Sachin Pilgaonkar | Dharmendra : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. 24 ) सकाळी त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. अमिताभ बच्चन, शबाना आजमी, संजय दत्त, सलमान खान, रणवीर सिंह-दीपिका पादुकोण असे अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी आले होते. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत लिहिले, “सर्वात देखणे धरम जी, दिग्गज व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे पण त्यांचा वारसा कायम राहील. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली यासाठी मी कायमच कृतज्ञ राहीन. खरा ही-मॅन कायम सर्वांच्या स्मरणात राहील. ॐ शांति” असं त्यांनी म्हंटलं आहे.
धर्मेंद्र यांच्या ‘शोले’ सिनेमात सचिन पिळगावकर होते. याआधी 1967 साली त्यांनी धर्मेंद्र यांच्या ‘मझली दीदी’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. धर्मेंद्र यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा पुढील महिन्यात सिनेमा महिनाभरात रिलीज होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.





