Sachin Pilgaonkar : “रात्री ३ वाजता जरी उठवलं तरी मी उर्दू बोलतो..”; सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत

Sachin Pilgaonkar | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक मुलाखतीतून सचिन पिळगावकर त्यांचे शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले.
मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. असंच काही पुन्हा एकदा घडलं आहे. “माझी मातृभाषा मराठी असली तरी मी उर्दू भाषेत विचार करतो…” असं त्यांनी म्हंटलं आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा तुफान ट्रोल करण्यात आलं आहे.
नुकतंच सचिन पिळगावकर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे त्यांच्यासोबत शेखर सुमन आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्यावेळी माझी मातृभाषा मराठी असली तरी मी उर्दू भाषेत विचार करतो, अशा शब्दात सचिन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सचिन पिळगावकर नुकतंच बहार ए उर्दू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी भावना व्यक्त करताना सचिन पिळगावकर म्हणाले की, ”माझी मातृभाषा मराठी आहे पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही रात्री ३ वाजता जरी उठवलं तरी मी उर्दू बोलून जागा होतो. मी केवळ उर्दूतून जागा होत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं.” अशाप्रकारे सचिन यांनी वक्तव्य केलं.
अभिनेते सचिन पिळगावकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी हिंदी ओटीटीविश्वात त्यांच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला. आजपर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.





