हृतिक रोशनमुळे सबा आझादच्या करिअरमध्ये अडथळा? म्हणाली “दोन वर्षानंतर…”

Saba Azad | अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड म्हणून अभिनेत्री सबा आझाद सध्या चांगलीच चर्चेत आहे. हृतिक रोशन आणि सबा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच सबाने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने दोन वर्षानंतर काम मिळाल्याचे म्हंटले आहे. हृतिकमुळे तिला काम मिळत नसल्याचे तिने म्हंटले आहे. त्यामुळे सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
सबाने रेकॉर्डिंग रुममधील एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर तिला २ वर्षानंतर काम मिळाल्याचं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. “जवळपास २ वर्षांपेक्षा जास्त काळानंतर वॉईस रेकॉर्ड करत आहे.”
तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, आपण अजूनही अशा काळात राहतोय का, जिथे एका स्त्रिला यशस्वी लाइफ पार्टनर भेटल्यानंतर तिला स्वत:च्या कष्टाची कमाई करावी लागत नाही? असा समज आहे. किंवा, तिला घरभाड किंवा बील भरण्याची गरज लागत भासत नाही? तिला स्वत:च्या कामाचा अभिमान बाळगावा किंवा तिने तिच्या घरची जबाबदारी घ्यावी? या कशाचीच गरज नसावी असं वाटतं?” असे सवाल सबाने केले आहे. Saba Azad|
“मुळात म्हणजे ही कल्पना अत्यंत जुनी आहे. यामुळेच मी माझे संपूर्ण करिअर गमावले आहे, जे माझ्या अत्यंत जवळचे होते. आता लोकांना वाटते की, मला काम करण्याची गरज नाहीये. खरोखरच ही विचित्र मानसिकता आहे. ज्या लोकांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगते, स्वत:च्या पायावर उभे असलेले जे दोन लोक एकत्र येतात तेव्हा ते कधीच त्यांचं करिअर सोडत नाहीत. ते कायम त्यांची ओळख निर्माण करत असतात. प्लीज तुमची विचारसरणी बदला,” अशी विनंती देखील तिने केली आहे. Saba Azad|
सबाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने 2008 मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, परंतु 2011 मध्ये आलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटाद्वारे तिला यश मिळाले.
हेही वाचा:
बॉक्स ऑफिसवर सिंघम पुन्हा भुल भुलैया 3 सोबत भिडणार…







