South Africa vs Sri Lanka 2nd Test Match Highlights : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आणि यजमान संघाने शेवटचा सामना म्हणजेच म्हणजे दुसरा कसोटी सामन्यातही शानदार विजयाची नोंद केली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 109 धावांनी पराभव केला आणि कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. पहिल्या सामन्यात प्रोटीज संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला होता.
असा झाला सामना….
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 5 ते 9 डिसेंबर दरम्यान खेळला गेला. यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या होत्या. यानंतर त्यांनी श्रीलंकेला पहिल्या डावात 328 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात 30 धावांची आघाडी घेतली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 317 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह श्रीलंकेला विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 238 धावांत आटोपला आणि संघाला 109 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
South Africa wrap the win quickly on day 5 and move closer to booking their spot in the WTC final! https://t.co/NFTNBsmCXH #SAvSL pic.twitter.com/mCWjU2YI6i
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 9, 2024
टेम्बा बावुमा ठरला मालिकावीर….
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेणाऱ्या डेन पीटरसनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली तर टेम्बा बावुमाला या कसोटी मालिकेसाठी मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. श्रीलंकेविरुद्ध टेम्बा बावुमाचे नेतृत्वही उत्कृष्ट होते आणि त्याने फलंदाजीतही कर्णधारपदाची खेळी केली. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज होता. या कसोटी मालिकेतील त्यानं 4 डावांमध्ये त्याने 81.5 च्या सरासरीने सर्वाधिक 327 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने एक शतक आणि 3 अर्धशतकेही झळकावली. या कसोटी मालिकेत टेम्बांची सर्वोत्तम धावसंख्या 113 धावा होती आणि यादरम्यान त्याने 29 चौकार आणि 4 षटकारही मारले.
NZ vs ENG 2nd Test : न्यूझीलंडचा मोठा पराभव! इंग्लंडनं 323 धावांनी मिळवला विजय…
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ….
श्रीलंकेच्या क्लीन स्वीपनंतर दक्षिण आफ्रिकेनेही ऑस्ट्रेलियाचाही घमंड तोडला. ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, काहीच तासांमध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर ढकलले आणि गुणतालिकेत पहिले स्थान काबीज केले आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ 63.33 च्या विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 60.71 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ 57.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.