SA vs SL 2nd Test (Day 2) : श्रीलंकेकडून द. आफ्रिकेला चोख प्रत्युत्तर, दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 242 धावा…

SA vs SL 2nd Test (Gqeberha,Day 2) – पहिल्या दिवशी आश्वासक सुरुवात केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 358 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर श्रीलंका संघाने ही आफ्रिकेच्या पहिल्या डावाला चोख प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 242 धावांपर्यंत मजल मारली.
Day 2 | Stumps 🟢🟡
Another thrilling day of test match cricket!🏏
A Verreynne century started the day with a few wickets taken in the last 2 sessions play.🇿🇦South Africa: 358/10 (1st Innings)
🇱🇰Sri Lanka: 242/3 (1st innings)Sri Lanka trail by 116 runs going into Day 3.… pic.twitter.com/kvlZpvam3Q
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 6, 2024
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने 7 बाद 269 धावांपर्यंत मजल मारली होती. काल 48 धावांवर नाबाद असणाऱ्या काइल वेरेनने तिसरे कसोटी शतक झळकावले. त्याला कासिगो रबाडाने 22 धावा करताना सुरेख साथ दिली. मात्र वेरेन बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा डाव झटपट संपुष्टात आला. लाहिरु कुमाराने 4, असिथा फर्नांडोने 3, विश्वा फर्नांडोने 2 तर प्रभात जयसूर्याने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात श्रीलंकेनं सावध सुरुवात केली. सलामीवीर दिमुथ करुणारत्ने 20 धावा काढून तंबूत परतला. सलामीवीर पाथूम निस्संका व दिनेश चंडिमल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी केली. चंडिमल 44 धावा करून परतला. लंकेच्या 199 धावा झाल्या असताना निस्संका 89 धावांची जिगरबाज खेळी करून बाद झाला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज 40 तर कामींदू मेंडिस 30 यांनी अजून पडझड होऊ दिली नाही.
दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका संघाने 242 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील दक्षिण आफ्रिकेकडे अजून 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. कासिगो रबडा, डेन पॅटरसन व केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.





