IND vs SA 3rd T20 : सूर्याचा शतकी तडाखा, भारताचा द. आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर…

India vs South Africa 3rd T20 Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकांत सात गडी गमावून 201 धावा केल्या आहेत. तिसरी टी-20 आणि मालिका जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आता 202 धावा कराव्या लागतील.
Innings Break!
Captain @surya_14kumar ’s 100 (56) and @ybj_19’s 60 (41) steers #TeamIndia to 201/7 🙌
Over to our Bowlers now 👍#SAvIND pic.twitter.com/OpTQ1kzjWJ
— BCCI (@BCCI) December 14, 2023
सूर्यकुमारने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या बरोबरीला पोहोचला आहे. या दोघांचीही प्रत्येकी चार शतके आहेत. सूर्यकुमारने 100 धावा केल्या. 56 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले. यशस्वी जैस्वालने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली.
रिंकू सिंग 14 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 12 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चार धावा करून जितेश शर्मा हिट विकेटवर बाद झाला. रवींद्र जडेजा चार धावा करून धावबाद झाला. तिलक वर्मा याला खातेही उघडता आले नाही. मोहम्मद सिराज दोन धावा करून नाबाद राहिला. अर्शदीप खाते न उघडता नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत केशव महाराज आणि लिझार्ड विल्यम्सने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. नांद्रे बर्जर आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





