WTC 2025 Final : मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने केला विश्वविक्रम! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच जोडी

स्टार्क-हेझलवूड जोडीने रचला इतिहास –
मिचेल स्टार्कने नाबाद ५८ धावा आणि हेझलवुडने १७ धावांची उपयुक्त खेळी साकारत १०व्या विकेटसाठी ५९ धावांची शानदार भागीदारी साकारली. ही आयसीसी स्पर्धेच्या फायनलमधील १०व्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम १९७५ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांच्या नावावर होता, ज्यांनी वेस्टइंडीजविरुद्ध ४१ धावांची भागीदारी केली होती.
ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत केली कमाल –
South Africa made to toil as Starc and Hazlewood guide Australia to an imposing total 👀
Who will take the advantage in the afternoon session? 🤔
Follow #WTC25 Final LIVE: https://t.co/pQ7yVByD1d pic.twitter.com/8VkUpdVAIA
— ICC (@ICC) June 13, 2025
या सामन्यातील दुसऱ्या डावात एकेकाळी ऑस्ट्रेलियाने ७३ धावांवर ७ गडी गमावले होते. दक्षिण आफ्रिकेला वाटत होतं की ते लवकरच ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करतील. पण स्टार्क आणि हेजलवूड यांनी त्यांना थोपवलं. स्टार्कने संयमाने खेळत आपलं अकरावं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची संधी –
सध्या हा संघ विश्व कसोटी अजिंक्यपदाचा विजेता आहे. 2023 मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याची त्यांच्यासमोर सुवर्णसंधी आहे. मात्र, लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात २०० हून अधिक धावांचा पाठलाग करणे खूपच आव्हानात्मक आहे. आतापर्यंत फक्त ४ वेळा असा यशस्वी पाठलाग झाला असून, २००५ नंतर केवळ एकाच संघाला हे साध्य करता आले आहे. आता दक्षिण आफ्रिका हे कठीण लक्ष्य गाठते की ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्व कसोटी चॅम्पियन बनते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.





