S. Jaishankar : जागतिक आव्हानांना तोंड देताना बहुपक्षीय व्यवस्था अपयशी; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ब्रिक्स परिषदेत प्रतिपादन

नवी दिल्ली : विविध जागतिक आव्हानांना तोंड देताना, बहुपक्षीय व्यवस्था अपयशी ठरत असल्याचे दिसून येते आहे, जागतिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असलेले इतके गंभीर ताणतणाव सोडले गेले आहेत, हे समजण्यासारखे आहे, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशशंकर यांनी व्यक्त केले आहे. ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स गटाच्या दूरदृश्य माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते.
ब्रिक्स परिषदेच्या दूरदृश्य माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या परिषदेत पंतप्रदान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले वाढीव आयात शुल्क, बहुपक्षीयवाद आदी विषयांवर या परिषदेत चर्चा झाली.
ही परिषद अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी आयोजित केली गेली नसल्याचे यजमान ब्राझीलने यापुर्वीच स्पष्ट केले होते. भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार संबंध ताणले गेले असतानाही शांघाय सहकार्य संघटनेमध्ये भारताला सहभागी करून घेण्याचा उद्देश परिषदेत समतोल राखणे हा होता. भारत ब्रिक्सचा पुढील यजमान देश असणार आहे. तरी या परिषदेला पंतप्रधान मोदी अनुपस्थित राहिले होते.
व्यापार आणि गुंतवणूकीसाठी अंदाज वर्तवण्यायोग्य आणि स्थिर वातावरणाची अपेक्षा संपूर्ण जग सामुदायिकपणे करत आहे. आर्थिक पद्धती निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वांच्या फायद्याच्या असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा अनेक अडथळे येतात, तेव्हा अशा धक्क्यांतूनच सिद्ध करणे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असेही जयशंकर या परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
जागतिक आर्थिक चर्चेत आज व्यापार पद्धती आणि बाजारपेठेतील प्रवेश हे प्रमुख मुद्दे आहेत. व्यापाराला चालना देण्यासाठी जगाला रचनात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. वाढत्या अडथळ्यांमुळे आणि व्यवहार गुंतागुंतीचे करून काही फायदा होणार नाही. ब्रिक्स स्वतः त्यांच्या सदस्य राष्ट्रांमधील व्यापार प्रवाहांचा आढावा घेऊन एक उदाहरण ठेवू शकते. खुल्या, भेदभावरहित दृष्टिकोनाच्या तत्त्वांवर आधारित जागतिक व्यापार व्यवस्थेचे संरक्षण केले पाहिजे, असे भारताचे मत आहे, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.





