एस. जयशंकर यांनी घेतली जागतिक नेत्यांची भेट; द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या मार्गांवर केली चर्चा

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७९ व्या अधिवेशनानिमित्त आयोजित सर्वसाधारण संवाद सत्राच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय चर्चा केली.
श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभुमीवर या शेजारी देशाशी भारताचे संबंध सकारात्मक आणि रचनात्मक राहतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.
जयशंकर यांनी मंगळवारी फ्रान्स, पनामा आणि माल्टा येथील परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
जयशंकर यांनी स्पेन, सायप्रस आणि मोल्दोव्हाच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यांनी बोलिव्हिया आणि गयाना आणि बोलिव्हियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसह आणि हवामान कृतीसाठी युरोपियन आयुक्त यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या.





