Badrinath Controversial Comment : ‘त्याला तिथेच मरू द्या…’; क्रुणाल पंड्याबाबत माजी खेळाडूचे संतापजनक विधान, सोशल मीडियावर तीव्र संताप!
Badrinath Controversial Comment : एस. बद्रीनाथने आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याच्या दुखापतीवर केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

S Badrinath Controversial Comment on Krunal Pandya : आयपीएल २०२६ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील थरारक सामन्याने क्रीडाविश्व ढवळून निघाले असतानाच, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी खेळाडू आणि सध्याचा समालोचक एस. बद्रीनाथने आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याच्या दुखापतीवर केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईने दिलेल्या १६७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्था ३ बाद ३९ अशी बिकट झाली होती. अशा परिस्थितीत क्रुणाल पंड्याने मैदानात उतरून ४६ चेंडूत ७३ धावांची जिगरबाज खेळी केली. रायपूरच्या कडाक्याच्या उन्हात फलंदाजी करताना क्रुणालला प्रचंड ‘क्रँप्स’ (स्नायू ओढले जाणे) आले आणि तो वेदनेने विव्हळत जमिनीवर पडला. यावेळी खिलाडूवृत्ती दाखवत मुंबईचा यष्टिरक्षक रायन रिकल्टन त्याच्या मदतीला धावून आला.
बद्रीनाथच्या विधानाने खळबळ –
Co-commentator when Krunal got injured: “So nice of Rickelton to help Krunal there. Time and again.”
Badrinath: “Instead of helping, he should just let him die there so RCB loses.”
The other commentator was completely shocked. pic.twitter.com/Iy4AFcLshS
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) May 10, 2026
मैदानावर ही घटना घडत असताना तमिळ भाषेत समालोचन करणाऱ्या बद्रीनाथने अत्यंत टोकाची प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, बद्रीनाथ म्हणाले की, “रिकल्टनने क्रुणालला मदत करू नये, त्याला तिथेच क्रँप्सने मरू दिले पाहिजे, जेणेकरून आरसीबी हा सामना हारेल.” या विधानानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांना समालोचन पॅनलमधून तातडीने हटवण्याची मागणी केली जात आहे.
एस. बद्रीनाथचे स्पष्टीकरण –
You literally said, “It’s ok if opposition says, hey, die in cramps and laughs.”….. now justifying your comment, how shameless someone could be 🤢🤢 pic.twitter.com/WRu5owS6RA
— King In The North👑👑 (@KingInThe2North) May 11, 2026
या वादानंतर एस. बद्रीनाथने आपली बाजू मांडताना स्पष्टीकरण दिले आहे. त्याने असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा दावा केला असून, त्याच्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आरसीबीने हा सामना शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून जिंकला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.





