satara | रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची ९४ व्या पुण्यतिथी सोमवारी
Updated On:

सातारा (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयतमाऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या ९४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखांच्या वतीने सोमवार, दि. ८ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नंबर १ धनिणीची बाग येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
पुण्यतिथी कार्यक्रम संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी ऑडीटर प्राचार्य विश्वासराव गणपतराव काळे हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास सातारा येथील शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केलेले आहे.





