UP T20 League 2025 : ऋतुराजने उडवला भुवनेश्वरचा धुव्वा! १९व्या षटकात पाडला तब्बल इतक्या धावांचा पाऊस, पाहा VIDEO

Bhuvneshwar Kumar Poor Performance Video Viral in Up T20 League 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी यूपी टी20 लीगमधील मंगळवारचा सामना निराशाजनक ठरला. लखनऊ फाल्कन्स आणि मेरठ मॅव्हेरिक्स यांच्यातील या रोमांचक सामन्यात मेरठच्या ऋतुराज शर्माने भुवनेश्वरच्या शेवटच्या षटकात धावांचा पाऊस पाडला, ज्यामुळे सामन्याचा निकाल मावेरिक्सच्या बाजूने झुकला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
भुवनेश्वरने पहिल्या तीन षटकांत केवळ 20 धावा दिल्या होत्या, परंतु 19व्या षटकात ऋतुराजने आक्रमक फलंदाजी करत मेरठ मॅव्हेरिक्सचा धावफलक 233 धावांपर्यंत नेला. लखनऊ फाल्कन्सला हा सामना 93 धावांनी गमवावा लागला. ज्यामुळे भुवनेश्वर कुमारची खराब गोलंदाजी चिंतेचा विषय ठरला आहे. त्याने अवघ्या एका षटकात २९ धावा दिल्या.
ऋतुराजने भुवनेश्वरच्या षटकात पाडला धावांचा पाऊस –
𝙏𝙃𝙀 𝙎𝙃𝙊𝙒𝘿𝙊𝙒𝙉: Rituraj Sharma vs Bhuvneshwar Kumar. A smashing over for Rituraj.
Watch live on SonyLIV and Sony Sports Network. #UPT20League #ANAXUPT20League #KhiladiYahanBantaHai #LFvsMM pic.twitter.com/zFsfE1vhez
— UP T20 League (@t20uttarpradesh) August 27, 2025
भुवनेश्वर कुमारने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्या तीन षटकांत शानदार गोलंदाजी करत फक्त 20 धावा दिल्या. मात्र, 19व्या षटकात ऋतुराज शर्माने त्याला लक्ष्य केले. ऋतुराजने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर चार चौकार आणि आणखी एक षटकार लगावला. या षटकात एकूण 29 धावा बनल्या, ज्यामुळे मेरठ मॅव्हेरिक्स मजबूत स्थितीत पोहोचले.
हेही वाचा – BMW Championship 2025 : एका माशीमुळे गोल्फर ठरला करोडपती! चॅम्पियनशिपसह जिंकले १७ कोटी, पाहा VIDEO
या षटकाने लखनऊ फाल्कन्सच्या विजयाच्या आशा धुळीला मिळाल्या आणि भुवनेश्वरच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याने चार षटकांत 49 धावा देत केवळ एकच विकेट घेतली. या हंगामात त्याने पाच सामन्यांत फक्त चार विकेट्स घेतल्या असून, त्याचा स्ट्राइक रेट 30 आहे आणि इकॉनॉमी रेट 8 पेक्षा जास्त राहिला आहे.
हेही वाचा – Commonwealth Games 2030 : कॉमनवेल्थ गेम्सच्या बोलीला मंत्रिमंडळाची मंजुरी, ‘या’ शहराला यजमानपदाची मान्यता
लखनऊ फाल्कन्स 140 धावांत गारद –
मेरठ मॅव्हेरिक्सच्या 233 धावांचा पाठलाग करताना लखनऊ फाल्कन्सची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संघ 140 धावांतच गारद झाला. समीर चौधरीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. मेरठकडून ऋतुराज शर्मा 74 धावांवर नाबाद राहिला, तर स्वास्तिक चिकाराने 31 चेंडूंमध्ये 55 धावा आणि रिंकू सिंगने 27 चेंडूंमध्ये 57 धावा काढल्या. ऋतिक वत्सने अवघ्या आठ चेंडूंमध्ये 35 धावांचे योगदान देत मेरठला मजबूत स्थितीत नेले. या विजयासह मेरठ मॅव्हेरिक्सने सामन्यावर वर्चस्व गाजवले.





