BMW Championship 2025 : एका माशीमुळे गोल्फर ठरला करोडपती! चॅम्पियनशिपसह जिंकले १७ कोटी, पाहा VIDEO

BMW Championship 2025 : नशिबाची साथ असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. अशीच प्रचिती अमेरिकेतील मॅरिलँडच्या केव्स वॅली गोल्फ क्लबमध्ये पाहायला मिळाली. अमेरिकेत एका ब्रिटीश गोल्फरला नशिबाची साथ मिळाली आणि एका माशीने त्याच्या नशिबाचे दार उघडले. एका माशीमुळे गोल्फरने बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली नाही तर 17 कोटीचे बक्षीस देखील मिळवले. गोल्फर टॉमी फ्लीटवूडला नशिबाची जबरदस्त साथ मिळाली. त्याने या विजयाचे श्रेय सोशल मीडियावर तरी माशीला दिले आहे.
माशीने जिंकून दिले 17 कोटीचे बक्षीस –
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिला तर तुम्हीही म्हणाल काय नशिब आहे. कारण टॉमीने जेव्हा शॉट होलकडे मारला. तेव्हा चेंडू किंचितसा होलमध्ये जाता जाता थांबला. त्यामुळे संधी हुकली असे वाटलं. पण काही सेकंदात चमत्कार झाला. याच चेंडूवर एक माशी येऊन बसली व तीच्या वजनाने चेंडू होलमध्ये गेला व टॉमीने सामना जिंकला. गोल्फर टॉमी फ्लीटवूटच्या या शॉटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही स्पर्धा संपली असून या शॉटमुळे ऐतिहासिक ठरली आहे.
An up-close look at Tommy Fleetwood’s final tee shot minutes before his first-ever #PGATour win. 🔥 Definitely had all of the #ATL rooting for him today at #TourChampionship. #FedExCup #GolfLife #PGATour #pgatourchampionship #TommyFleetwood pic.twitter.com/FORfQRsWVW
— Jonathan Adams (@JonDAdams) August 24, 2025
नक्की काय घडलं?
अंतिम फेरीत ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लीटवुडने सात अंडरने सुरुवात केली आणि चेंडू होलच्या दिशेने मारला. शॉट इतका जबरदस्त होता की चेंडू होलाच्या अगदी कडेला थांबला. टॉमीला काही सेकंद हा सामना गमावला असेच वाटले. पण काही सेकंदात नव्हत्याचे होते झाले. चेंडू अडकला होता तिथे एक माशी उडत आली आणि त्यावर बसली. त्यानंतर माशी चेंडूवरून सरकत पुढे आली आणि चेंडू सरळ होलमध्ये गेला.
#TommyFleetwood shoots 18 under at East Lake to win the tour championship and his first Victory @ a PGA event after 164 PGA starts. Way go Tommy! pic.twitter.com/1RgNaS2Ofm
— Steve (@spacecoastgolf) August 24, 2025
त्यामुळे टॉमीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पीडीएने 10 सेकंदाच्या नियमामुळे त्याला विजेता घोषित केले. सुरुवातीला असे कसे झाले यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. पण जेव्हा कॅमेरा फुटेज बारकाईने पाहिले तेव्हा चेंडूवर माशी बसल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे
हेही वाचा – Commonwealth Games 2030 : कॉमनवेल्थ गेम्सच्या बोलीला मंत्रिमंडळाची मंजुरी, ‘या’ शहराला यजमानपदाची मान्यता
दुसरीकडे, इतकी छोटी माशी चेंडू हलवू शकते का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. न्यूयॉर्क पोस्टने या व्हिडिओचे विश्लेषण करताना सांगितले की, माशीचे वजन जवळपास 1 मिलीग्राम असते. त्या चेंडूचे वजन अधिक असते. अशा स्थितीत चेंडू हलवून होलमध्ये पडणे कठीण आहे. दुसरीकडे, न्यूयॉर्क सिटी कॉलेजचे प्रोफेसर मिचियो काकू यांच्या मते, फिजिक्समध्ये एक टिपिंग पॉइंट कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे मोठ्या वस्तूही हलक्या झटक्याने पडू शकतात.

