Ruturaj Gaikwad Injured : टीम इंडियाला मोठा झटका! ऋतुराज गायकवाडच्या डोक्याला दुखापत; रिटायर्ड हर्ट होऊन परतला तंबूत
Ruturaj Gaikwad Injured : भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत असताना गंभीररित्या जखमी झाला आहे.

Ruturaj Gaikwad Injured Helmet Hit IND A vs SL A 2nd Unofficial Test : ‘इंडिया ए’ आणि ‘श्रीलंका ए’ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या अनऑफिशियल कसोटी सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढवणारी एक घटना घडली आहे. भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत असताना गंभीररित्या जखमी झाला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असंका मनोज याचा एक भयंकर बाउन्सर चेंडू थेट ऋतुराजच्या हेलमेटवर जाऊन आदळला.
या जोरदार फटक्यानंतर ऋतुराजला चक्कर आल्यासारखे वाटू लागल्याने तो १३ धावांवर असताना ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदानातून बाहेर पडला. त्याच्या या दुखापतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट समोर आले नसून, तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
मल्टी-डे फॉरमॅटमध्ये ऋतुराजचा फ्लॉप शो –
THE INJURY UPDATE ON RUTURAJ GAIKWAD.🥺
Ruturaj Gaikwad copped a blow on his body as got injured on bowling of Ashanka Manoj.
Gaikwad unable to continue his innings due injury and leaves the ground – Retired hurt on 13 from 42 balls. pic.twitter.com/7C9UJ47RaJ
— Maina Singh (@Maina_Singhx77) July 4, 2026
ऋतुराज गायकवाडने यापूर्वी श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तिरंगी टी-२० मालिकेत धावांचा पाऊस पाडला होता; मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म चिंताजनक दिसत आहे. पहिल्या अनऑफिशियल कसोटीच्या दोन डावांत त्याला अनुक्रमे २२ आणि अवघ्या १ धावेवर समाधान मानावे लागले होते. अर्थात, ऋतुराजचा एकूण प्रथम श्रेणी रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट आहे. त्याने ४६ सामन्यांच्या ७८ डावांत ४४.३३ च्या सरासरीने ३,२८१ धावा केल्या असून, यात ९ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.
साई सुदर्शनचे सलग दुसरे शतक; ‘इंडिया ए’चा डोंगर –
ऋतुराज दुखापतग्रस्त झाला असला, तरी ‘इंडिया ए’च्या इतर फलंदाजांनी लंकन गोलंदाजांची पिसें काढली. सलामीवीर साई सुदर्शनने सलग दुसरे झंझावाती शतक झळकावताना २६७ चेंडूंत १६८ धावांची महाकाय खेळी खेळली. त्याला उत्तम साथ देत देवदत्त पडिक्कलनेही ९१ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ५ बाद ५३४ धावांचा डोंगराएवढा स्कोअर उभा केला आहे. सध्या मैदानात सारांश जैन आणि आकिब नबी यांची जोडी खेळत आहे.





