Russian Helicopter : रशियाच्या अतिपूर्वेकडील बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर झाले दुर्घटनाग्रस्त

Russian helicopter – रशियाच्या अतिपूर्वेकडील भागात काल बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या हेलिकॉप्टरमधील १७ प्रवाशांचे मृतदेह देखील बचाव पथकाला सापडले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ प्रवासी होते.
अन्य प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बहुतेक सर्व प्रवाशांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे रशियातल्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज देखील या वृत्तसंस्थेने वर्तवला आहे.
कामचात्का प्रातांतील वेचकाझेत्स ज्वालामुखीजवळून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. ते जेऊन बेपत्ता झाले, तेथून ९०० मीटर अंतरावर दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आढळून आले आहे, असे आपत्कालिन मंत्रालयाने टेलिग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





