Russia-Ukraine War : लगीनगाठ बांधली अन् पहिल्या दिवशी नवदाम्पत्याने गाठली युद्धभूमी

किव्ह, – रशियाच्या आक्रमणाच्या पहिल्या दिवशीच यारयना अरीइव्हा आणि स्वीअतोस्लाव्ह फरसीन या दाम्पत्याने विवाह होताच रणभूमी गाठली. खरे तर हे दाम्पत्य मे महिन्यात विवाहबध्द होणार होते. मात्र रशियाने आक्रमण करताच युक्रेनच्या संरक्षणासाठी दाखल होण्यापुर्वी त्यांनी एकमेकांना जीवनसाथी बनवले.
बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून हातात रायफल घेतलेल्या या दाम्पत्याने सांगितले की मधुचंद्र सोडून आम्ही हातात रायफल घेतली आहे. आमच्या मातृभूमीत घुसलेल्या रशियन नागरिकांना आम्हाला हाकलून द्यायचे आहे. ही वस्तुस्तिथी पचवणं आम्हाला जड जातंय, अरीइव्हा आपल्या भावना व्यक्त करत होती.
उन्हाळ्याच्या पहिल्या दिवशी नागरिक राष्ट्रीय फूल असणाऱ्या सूर्यफुलाची लागवड करतात. पण यंदा त्या ऐवजी रशियन हल्ल्याचा प्रतिकार करत आहेत. आम्ही हारू असे कोणालाच वाटत नाही किंवा हल्ल्यामळे कोणीही रडत नाही. इथल्या प्रत्येकाला विश्वास आहे आम्ही जिंकु. फक्त वेळेचा प्रश्न आहे. लोकांचा हा उत्साह पाहून आम्हाला अतिव आनंद होत आहे. आपल्या भूमीसाठी ते मारायला तयार आहेत. आम्ही हे युध्द जिंकू यात आम्हाला कोणतीही शंका नाही, असेही ती म्हणाली.
तिचा पती फरसीन लिव्ह येथे राहतो. तो म्हणतो, आमच्या लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला ते तयार आहेत.
या रणभूमीवर तो असला तरी त्याला त्याच्या कुटुंबियांची काळजी वाटते. त्याचे पालक आणि बहीन घरात आहेत. अरिव्हा म्हणाली, येथील आयुष्य वेगळे आहे. पण हेही आयुष्याचा भाग आहे. नागरिक हसत आहेत, विनोद करत आहेत, ते पाहणं किती गंममतीदार होतं. पण युध्दानं सारच बदललं; पण, हेही आयुष्य आहे!
फोटो आहे





