नवी दिल्ली – रशिया -युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉलर बळकट होत आहे. या कारणामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट होत आहे. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही या दोन धातूच्या दरात घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर चारशे रुपयांनी कमी होऊन 1 लाख 20 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दीड हजार रुपयांनी कमी होऊन 1 लाख 12 हजार 500 रुपये प्रति किलो झाला. मात्र तरीही जागतिक व्यापार युद्धाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात लघु पल्ल्या जास्त घट होणार नाही असे वातावरण आहे, असे विश्लेषकांनी यासंदर्भात नमूद केले. लवकरच अमेरिकेच्या रिझर्व बँकेचे पत धोरण जाहीर होणार आहे. त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागणार आहे.